नितीन रायभान भवर व अभिजित पानसरे असे आरोपींचे नाव असून आपल्याला नासा या संस्थेकडून RRC REACTOR OF FIVE MAGNET हे प्रकल्प तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे अशा प्रकारची थाप मारून २८ जणांना तब्बल २.५ कोटींचा गंडा घातला आहे या प्रकरणी नितीन भवर यास अटक करून न्यायालयात हजर केले असता जिल्हा व सत्र नायालयाचे न्यायधिश डॉ. देशपांडे यांनी आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात नाशिकचा अभिजित पानसरे या आरोपीचा हात असून त्यालाही अटक करण्यात आलेली आहे
या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.






