आधारकार्ड अपडेट करायचंय? मग वाचा कशासाठी किती रुपये लागणार
आधारकार्ड नव्याने काढणे किंवा आधारकार्डमध्ये दुरुस्ती करायची असल्यास घराजवळ कोणत्या ठिकाणी आधार केंद्र आहे आणि कोणते केंद्र सुरू आहे, याची माहिती आता नागरिकांना टोल फ्री क्रमांकावरून घरबसल्या मिळणार आहे.
आधार केंद्र शोधण्याच्या त्रासातून नागरिकांची सुटका होणार आहे. या सुविधेसाठी युनिट आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) टोल फ्री १९४७ क्रमांक जाहीर केला आहे.
आधारची कामे आणि शुल्क –
आधारकार्डची नव्याने नोंदणी ही नि:शुल्क आहे – आधारकार्डवरील पत्ता, मोबाइल क्रमांक, छायाचित्र, लिंग आणि जन्मतारीख यांमध्ये बदल करण्यासाठी ५० रुपये.
बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन करणे अशा बायोमेट्रिक कामांसाठी १०० रुपये.
केंद्र चालकाने अधिक रकमेची मागणी केल्यास १९४७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार