शिर्डी जवळील निर्मळपिंप्री शिवारातील टोल नाक्यावर ट्रक आडवुन खुनासहित दरोडा करणारे सराईत आरोपी २४ तासाचे आत जेरबंद लोणी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांची संयुक्त कारवाई.

863

शिर्डी जवळील निर्मळपिंप्री शिवारातील टोल नाक्यावर ट्रक आडवुन खुनासहित दरोडा करणारे सराईत आरोपी २४ तासाचे आत जेरबंद लोणी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांची संयुक्त कारवाई.

दिनांक ०७/०९/२०२० रोजी फिर्यादी भुपेंद्रसिह बहादुरसिहं ठाकुर वय ३६ वर्ष, धंदा ड्रायव्हर, रा. रामाहेगव, ता.धरमपुरी जि. धार (मध्यप्रदेश) यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, फिर्यादी व त्यांचा साथीदार कुलदीपसिहं तुंग हे दोघे ट्रक गाडी नं.एमएच-०९-एचएच-५१९३ या गाडीतुन गहु भरुन इंदोर येथुन बैंगलोर येथे जात असतांना दिनांक ०६/०९/२०२० रोजी २२/१५ ते २२/३० दरम्यान निर्मळपिंप्री शिवारात मनमाड ते अहमदनगर जाणारे रोडवर असलेल्या टोलनाक्या जवळुन जात असतांना ६ ते ७ इसम मालट्रकला आडवे होवुन त्यांनी लाकडी दांडक्यांचा , तलवारीचा व चाकुचा धाक दाखवुन ट्रक थांबवुन फिर्यादीचे मानेवर चाकुचा वार करुन त्यास जबर दुखापत करुन फिर्यादी जवळचे रोख ३००/- रु. जबरदस्तीने काढुन घेतले व कुलदीपसिंह तुंग वय ४८ वर्ष याने मानेवर चाकुचा वार करुन स्वत:चे आर्थिक फायदयासाठी त्यास जबर दुखापत करुन जिवे ठार मारले आहे. वगैरे मजुकरचे फिर्याद दिल्याने लोणी पो.स्टे. गु.र.नं. ७३८/२०२० भादवी कलम ३९६,३९७,३४१ आर्म अॅक्ट कलम ४/३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याप्रमाणे दिनांक ०७/०९/२०२० रोजी फिर्यादी खालीद वाहद शेख वय ३५ वर्ष धंदा ड्रायव्हर रा. आयशानगर मालेगाव जि. नाशिक यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, फिर्यादी व त्यांचा साथीदार नामे आयुब शेख असे त्यांचे ताब्यातील ट्रक नं. एमएच-१५-ईजी-५८०८ मधुन गहु भरुन मालेगाव येथुन बैंगलोर असे जात असतांना दिनांक ०६/०९/२०२० रोजी २२/०० ते २३/०० दरम्यान निर्मळपिंप्री शिवारात मनमाड ते अहमदनगर जाणारे रोडवर असलेल्या टोलनाक्या जवळ फिर्यादी व साथीदार हे त्याचे ताब्यातील ट्रक ही थांबवुन लघुशंकेसाठी थांबले असता ६ ते ७ इसमांनी येवुन फिर्यादीस तलवार,लाकडी दांडके व चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील रोख रक्कम २५०००/- रु. बळजबरीने काढुन घेतले वगैरे मजकुरचे फिर्यादी वरुन लोणी पो.स्टे. गु.र.नं. ७३९/२०२० भादवी कलम ३९७,३४१ आर्म अॅक्ट कलम ४/३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर दोन्ही गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मा.पोलीस अधीक्षक सो यांनी मा, अपर पोलीस अधीक्षक सो अहमदनगर सागर पाटील सो. मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सोमनाथ वाकचौरे व स्थानिक गुन्हे शाखाचे श्री. दिलीप पवार यांचेसह तात्काळ घटनास्थळी भेट देवुन यातील फिर्यादी कडे सविस्तर चौकशी करुन घटनास्थळाची अंगुलीमुद्रा तज्ञ, डॉग स्कॉड व फॉरेन्सीक व्हॅन यांचे मदतीने अत्यंत बारकाईने पहाणी करुन मा. पोलीस अधीक्षक सो. यांनी सर्व संबधीत अधिकारी यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सुचना दिल्या त्यांचे सुचनाप्रमाणे
उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सोमनाथ वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीसांचे दोन पथके व स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली सदर सुचना व मार्गदर्शना प्रमाणे गुन्हयाचा तपास करीत असतांना लोणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोना/ दिपक रोकडे यांना माहिती मिळाली की, कोल्हार परीसरात राहणारा किरण राशीनकर व त्याचे साथीदारांनी सदरचे गुन्हे केले आहेत. तसेच मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. वाकचौरे सो. यांना सुध्दा सदर आरोपी विषयी खात्रीशिर माहिती मिळाल्याने त्यांनी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देवुन सदर आरोपीना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे लोणी पोलीस स्टेशनचे पोसई सुर्यवंशी , पोहेको/ औटी, पोना/ रोकडे, पोना/ कुसळकर यांनी सदर आरोपी नामे (१) किरण राजु राशीनकर वय २४ रा. भगवतीपुर, कोल्हार यास ताब्यात घेतले व सदर गुन्हयांचे अनुषंगाने त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयात सहभागी असलेल्या इतर आरोपींनीचे नावे सांगीतली त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला सोबत घेवुन गुन्हयात सहभागी असलेले इतर आरोपी नामे (२) सोहेल नशीर शेख वय १९ रा.पिंजारगल्ली, कोल्हार (३) संतोष सुरेश पठारे वय २४ रा.चर्चजवळ, कोल्हार (४) विशाल कचरु लोखंडे वय १९ रा. कोल्हार हाऊसींग सोसायटी (५) अक्षय राजेंद्र शिंदे वय १९ रा. राऊतवस्ती, कोल्हार (६) संकेत किरण लोखंडे वय १८ रा.भारत पेट्रोलपंपा जवळ, कोल्हार (७) रुपेश ज्ञानेदव चव्हाण वय १८ रा. सुरेंद्र खेडे यांचे वस्तीवर, कोल्हार (८) सागर सोमनाथ देशमाने वय ३२ रा. अंबीकानगर कोल्हार यांना कोल्हार परीसरातुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयामध्ये आरोपी असलेला आनखी एक इसम फरार असुन त्याचा शोध चालु आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडे उप विभागीय पोलीस अधिकारी, सोमनाथ वाकचौरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि./दिलीप पवार, लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि/ प्रकाश पाटील, सपोनि/शिशीरकुमार देशमुख, पोसई सुर्यवंशी यांनी सखोल व बारकाईने चौकशी केली असता सदर आरोपीनी

सदरचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींना गुन्हयात अटक करुन पुढील कारवाई लोणी पोलीस स्टेशन

करीत आहे.

वरील सर्व अटक आरोपीतांना आज रोजी मा. कोर्टासमोर हजर केले असता त्यांना दिनांक ११/०९/२०२० रोजी पावेतो पोलीस कस्टडी मिळाली असुन गुन्हयाचा पुढील तपास योग्यरित्याने सुरू आहे. *आरोपी नामे सागर सोमनाथ देशमाने रा. अंबीकानगर कोल्हार याचेवर दाखल असलेले गुन्हे. १) कोपरगाव पो. स्टे. गु.र.नंबर T२५/२०१७ भा.द.वि. कलम ३९५,२०१

२) राहाता पो.स्टे. गु.र.नंबर T१०/२०१९ भा.द.वि. कलम ३२४ * आरोपी नामे किरण राजु राशीनकर रा. भगवतीपुर,कोल्हार याचेवर दाखल असलेला गुन्हा.

१) लोणी पो. स्टे. गु.र.नंबर 1 १०/२०१९ भा.द.वि. कलम ३७९

सदरची कौतुकास्पद कारवाई मा. श्री. अखिलेश कुमार सिंह सो., पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.श्री. सागर पाटील,अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, (अतिरिक्त कार्यभार श्रीरामपूर ), मा. श्री. सोमनाथ वाकचौरे , उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली लोणी पो.स्टेचे पथकातील सपोनि प्रकाश पाटील, पोसई नाना सुर्यवंशी, पोहेकॉ अशोक शिंदे, पोहेकॉ/ राजेंद्र औटी, पोना/ दिपक रोकडे, पोना/ संभाजी कुसळकर, पोकॉ/ सोमनाथ वडणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोनि./दिलीप पवार, सपोनि/ शिशीरकुमार देशमुख, पोसई गणेश इंगळे पोहेको/ हिंगडे, पोहेकॉ/ मनोहर गोसावी, पोहेकॉ/ विजय वेठेकर, पोना/ सुनिल चव्हाण, पोना/ शंकर चौधरी, पोना अण्णा पवार, पोना/ विशाल दळवी, पोना/ राम माळी, पोना/संतोष लोढे, पोना/ दिपक शिंदे, पोकॉ/ मच्छिद्र बर्डे, पोकॉ/ योगेश सातपुते, पोकॉ/ रविंद्र घुगासे, पोकॉ/ संदिप दरंदले, पोकॉ/प्रकाश वाघ, पोकॉरणजीत जाधव, पोकॉ/जालींदर माने, चापोहेकॉ/कोतकर, चापोना/धुळे यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here