समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास हेलिकॉप्टरने अमरावती येथून वैजापूर तालुक्यातील गोलवाडी येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या प्रगती कामाचा आढावा श्री. ठाकरे यांनी यावेळी गोलवाडी येथे घेतला. त्यानंतर स्वतः गाडी चालवत समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली.
गोलवाडी येथे आयोजित समृद्धी महामार्ग आढावा बैठकीत त्यांचे स्वागत रोहयो मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. तसेच यावेळी आमदार सर्वश्री अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, संजय सिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होते.
या आढाव्याच्यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एलअँडटी कंपनीच्यावतीने समृद्धी महामार्ग पॅकेज 10 बाबत सविस्तर सादरीकरण श्री.ठाकरे यांच्यासमोर करण्यात आले. यामध्ये समृद्धी महामार्गाचा पॅकेज 10 प्रकल्प, प्रकल्पाची 57.90 कि.मी धावपट्टी, सर्व्हिस रोड, छोटे पूल, मोठे पूल, आगामी नियोजन, पॅकेज अंतर्गत या भागातील हरणांना जाण्यासाठी रस्ता, मनुष्यबळ निर्मितीवर भर आदींची सविस्तर तपशीलवार माहिती सादरीकरणाद्वारे देण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनीही यावेळी प्रकल्पाची सद्यस्थितीबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींनी प्रकल्पाच्यासंदर्भातील प्रश्न मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासमोर मांडले.

या कार्यक्रमास अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार,मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती होती.

समृद्धी महामार्ग प्रकल्प वेळेत पूर्ण करा : उद्धव ठाकरे

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॅकेज 10 अंतर्गत कामांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी त्यांनी या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत
हा प्रकल्प महाराष्ट्र दिनापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here