हृदयरोगाला दूर ठेवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक जण त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, शरीराची हेळसांड होते आणि अनेक व्याधींना आमंत्रण मिळतं. यातच सध्या अनेक जण हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब अशा समस्यांनी त्रस्त आहेत. यात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. वयाच्या २२-२३ वर्षाच्या तरुणांमध्येही समस्या जाणवत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे हृदयरोगाला दूर ठेवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तसंच व्यसनांपासूनदेखील दूर रहायला पाहिजे. चला तर पाहुयात हृदयविकार टाळण्यासाठीच्या काही खास टीप्स.
हृदयविकार टाळण्यासाठी खास टीप्स

१. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हृदयाच्या धमक्यांवर परिणाम होतो. यामुळे धुम्रपान आणि मदयपानाचे सेवन करणे टाळावेत.

२. नियमित व्यायाम करा.

३. सायकलिंग, चालणे, धावणे यासारखे व्यायाम प्रकार करा.

४. योग करा.

५. योग्य पद्धतीचा आणि सकस आहार घ्या.

६. सतत एका जागी बसून काम करु नका. त्यामुळे स्थुलता किंवा लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणामुळे अनेकदा हृदयावर त्याचा परिणाम होतो.

७. शक्यतो शाकाहारी जेवण करण्यावर भर द्या.

८. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here