कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालये कार्यरत असून, गुजरातमधील राजकोट येथे शिवानंद रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून सुरू आहे.
या रुग्णालयाला गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलानं घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार,
आग लागली त्यावेळी ICU कक्षात 11 रुग्ण उपचार घेत होते. यापैकी 5 जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
त्यानंतर काही वेळानं आग नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाला यश आलं. या आगीत अनेक रुग्ण होरपळले असून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
त्याचबरोबर शिवानंद रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
दरम्यान रुग्णालयाला लागलेल्या आगीचं कारण नेमकं कळू शकलेलं नाही. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिले आहेत.




