प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीला भेट..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीला भेट..

पुणे, दि.२८:- प्रधानमंत्री नरेंद्र रत मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड -१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here