डॉ.विजय मकासरे यांना भा.दं.वि.कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण केला)यासाठी अटक पुर्व जमीन मंजूर :


    डाँ. विजय मकासरे यांनी पि . आय. श्रीरामपूर पो.स्टे.यांच्या़विरूध्द ACB तसेच पोलीस कमिशनर साहेब, नाशिक यांच्या कडे तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्या अनुषंगाने तक्रार अर्जाची दखल लवकरात लवकर घ्यावी, असे नमूद केले होते. त्यामुळे श्रीरामपूर पोलिसांनी आकस बुद्धी ने डाँ. विजय मकासरे यांना भा.दं.वि.कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण केला ). सदर गुन्हामध्ये राहुरी पोलिसांनी डाँ. विजय मकासरे यांचां पुढील चौकशीसाठी ताबा मिळवा ,असे नमूद केले. परंतु डाँ. विजय मकासरे यांना सदर गुन्ह्यात आकसबुद्धिने व खोटेपणाने अडकविले/ गोवले असे सिद्ध झाले.

    वास्तविक पाहता सदर गून्हामध्ये पोलिसांनी डाँ. विजय मकासरे यांच्यावर आरोप केले. सदर आरोप हे कल्पनाशक्तीच्या बाहेरचे आहेत, असे मत माननीय कोर्टाने नोंदविले.तसेच सदर आरोप हे भा.दं.वि.कलम ३५३ या मध्ये समाविष्ट होत नाहीत. भा.दं.वि.कलम ३५३ हे शासकीय कर्मचाऱ्याला शक्ति व बळाचा वापर करून त्या कर्मचांऱ्या ला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी केलेला प्राणघातक हल्ला असे आहे. म्हणजेच शासकीय कामात अडथळा आणला.

    परंतु डॉ.विजय मकासरे यांनी वरील पैकी कोणतेही कृत्य केले नाही असे दाखल पुराव्यावरून मे. कोर्टाच्या निदर्शास आले आहे.तसेच मे. कोर्टाने डॉ विजय मकासरे यांचा अटपूर्व जमीन मंजूर केला आहे.सदर गुन्हा दाखल होण्यापूर्वी डॉ विजय मकासरे यांनी मा. पोलिस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे डी.वाय.एस. पी. राहुल मदने व पी आय . श्रीहरी बहिरट यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्या होत्या .याच द्वेषातून डी.वाय.एस. पी. राहुल मदने यांनी त्यांच्या स्वतःच्या कार्यक्षेत्रातील राहुल पोलीस स्टेशनमध्ये पी आय.श्रीहरी बहिरट व पी आय. मुकुंद देशमुख यांच्याशी संगनमत करून डॉ. विजय मकासरे यांच्याविरोधात आकस बुद्धीने सुबुद्धीने खोटा भा.दं.वि.कलम ३५३ चा गुन्हा नोंदविला.

    परंतु घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा असल्यामुळे त्यामध्ये डॉ.विजय मकासरे यांनी अशा प्रकारे कुठलाही सरकारी कामात अडथळा आणला नाही,असे मे. कोर्टाच्या निदर्शानास आणून दिले.त्याकामी डॉ.विजय मकासरे यांनी मे.कोर्टात सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज असलेली सीडी (CD )तसेच त्या संधार्भातील काही छायाचित्र (Photographs).पुराव्याकामी मे.कोर्टात दाखल केले.मे.कोर्टाने सदर दाखल केलेला सर्व पुरावा ग्राह्य धरून डॉ.विजय मकासरे यांना भा.दं.वि.कलम ३५३ (सरकारी कामात अडथळा निर्माण केला) या गुन्हासाठी अटकपूर्व जमीन मंजूर केला आहे. डॉ.विजय मकासरे यांच्या वतीने अॅड. बी.बी. पालवे , अॅड.शितल एस्. बेंद्रे, अॅड. डि. आर. मरकड यांनी कामकाज पहिले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here