*दुधासह अक्रोडचे सेवन करा; आरोग्यास खूप फायदे होतील!*
सुकेमेवे आपल्या शरीरासाठी तसेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक प्रकाराचे पोषक घटक असे ही असतात जे आपल्या शरीरास फायदे देतात. तसेच अक्रोडचे आरोग्यास खूप फायदे आहेत. तसेच याचे सेवन दुधात उकळवून केल्याने हे शरीराला फायदेशीर ठरतं. *हे आहेत फायदे..* ▪️ *कर्क रोगाचा धोका कमी होतो -* अक्रोडाचे सेवन दुधात उकळवून केल्याने हे शरीरामधील कर्करोगाच्या वाढणाऱ्या पेशी नष्ट करतात, ज्यामुळे आपण या आजारापासून मुक्त होऊ शकता. *हृदयरोगाचा धोका कमी करतो -* भारतातील कोट्यावधी लोक हृदयरोगाच्या आजाराने ग्रस्त आहेत. वास्तविक, अक्रोडमध्ये हृदय कार्डियो प्रोटेक्टिव एक्टिविटी असते, जे प्रामुख्याने हृदय रोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे. *वाढत्या वयाचा परिणाम कमी करतो -* अक्रोडमध्ये अँटी एजिंग गुणधर्म आढळतात. जे वाढत्या वयाच्या प्रभावाला कमी करू शकतात. हे गुणधर्म दुधात देखील आढळतात. *मेंदूला तीक्ष्ण बनवतो -* दूध आणि अक्रोडमधील पौष्टिक घटक मेंदूला चालना देण्यासाठी मदत करतात. तसेच हे मेमरी पॉवर म्हणजेच स्मरण शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतात. *मधुमेहाचा धोका कमी करतो -* एका संशोधनानुसार, दूध आणि अक्रोडचे एकत्र सेवन केल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. या मुळे मधुमेहाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. टीप -* ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून आपल्या आहारामध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी आहार तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.