चांदबिबी महाल परिसरातील बिबट्यांचा वावर
नगर : नगर शहरालगत असलेल्या चांदबिबी महाल वनक्षेत्र परिसरांमध्ये आज रात्री तीन ते चार बिबटे एकाच वेळेस फिरताना दिसले. नगर शहरातील व्यावसायिक मिलिंद कुलकर्णी हे आज रात्री आपल्या कुटुंबासह चांदबिबी महाल परिसरात चार चाकी वाहनातून फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांना एकाच ठिकाणी तीन ते चार बिबटे दिसले. त्यांनी या बिबट्यांचे चित्रिकरण देखील केले. समाज माध्यमांवर हे चित्रीकरण चांगलेच व्हायरल झाले आहे.
यातच चांदबिबी वनक्षेत्र परिसरांमध्ये एकाच वेळेस तीन ते चार बिबटे एकाच ठिकाणी दिसण्याची घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरांमध्ये नागरिकांनी पहाटे फिरण्यास पायी, सायकल किंवा दुचाकीवरून जाऊ नये, रात्रीच्या वेळेस या भागांमध्ये संचार टाळावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
दरम्यान वन विभागाने उद्यापासून चांदबिबी महाल परिसरातील वनक्षेत्रामध्ये नागरिकांना प्रतिबंध केला आहे. विनापरवानगी वनक्षेत्रात फिरल्यास संबंधित नागरिकांवर कारवाई करण्याचा इशाराही वन विभागाने दिला .
व्हिडिओ पहा ?
https://www.facebook.com/108742957571288/videos/175244824281780/