छायाचित्र मतदार याद्यांचा पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर ; नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन
अहमदनगर :- भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचेकडून दि. 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांना आणि नवीन मतदार म्हणून पात्र असलेल्या मतदारांना संधी देणे तसेच नाव नोंदणी वाढविणे व चुका विरहित मतदार याद्या तयार करणे हा आहे. सदर मतदार याद्या पुन:रिक्षण कार्यक्रम दि. 30 सप्टेंबर 2020 पासून राबविला जात असून ते 15 जानेवारी 2021 पर्यंत राबविला जाणार आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 17 नोव्हेबर 2020 रोजी एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवमतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.





