चीनचा भारतासंबंधी मोठा निर्णय

जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे उगमस्थान असणाऱ्या चीनने आता भारतासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. चीनने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. चीनने घेतलेला हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे. ? चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंबंधी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यानुसार, भारतात असणाऱ्या चिनी दुतावासाकडून व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही. आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. 3 नोव्हेंबर नंतर व्हिसा दिलेल्यांना कोणताही अडथळा येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here