सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. चार भिंतीच्या आत अनुसूचित जाती किंवा जमातीमधील कुठल्याही व्यक्तीविरोधात काही अपमानजनक बोलल्यास किंवा कुठलाही साक्षीदार ज्या गोष्टीबाबत नसेल, अशी घटना अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकत नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच याचिकाकर्त्यांविरोधात यासंदर्भात अॅट्रॉसिटींतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. ? हितेश वर्मा नावाच्या व्यक्तीवर घरामध्ये अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप उत्तराखंडमधील एका महिलेने केला होता. पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात त्या आधारावर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी करताना सांगितले की, सर्व प्रकारचा अपमान आणि धमक्यांचा अंतर्भाव अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये होत नाही. तर ज्यामध्ये पीडित व्यक्तीला समाजासमोर अपमान, शोषण आणि त्रासाचा सामना अशा घटनांचा या कायद्यामध्ये अंतर्भाव होतो. पीडित आणि आरोपींव्यतिरिक्त अन्य व्यक्तींच्या उपस्थितीत या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी गुन्हा घडणे आवश्यक आहे. ? संबंधित घटनेचे पुरावे पाहिल्यास अॅट्रोसिटी कायदा अधिनियमामधील कलम ३(१) (आर) नुसार गुन्हा घडलेला नसल्यामुळे या प्रकरणात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र रद्द करण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने सांगितले. अन्य कलमांनुसार आरोपी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून खटला चालवता येऊ शकतो.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
मंगल कार्यालयाचा खर्च लाखांच्या पटीत पण उत्पन्न मात्र शून्य
मंगल कार्यालयाचा खर्च लाखांच्या पटीत पण उत्पन्न मात्र शून्य
पुणे - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील सहा महिन्यांपासून राज्यातील लग्नकार्य,...
High Court Dismisses Plea To Summon Actor Vivek Oberoi, Family In Alleged Cheating Case
New Delhi:
The Delhi High Court has dismissed a plea seeking summoning of Bollywood...
PM Modi In Pune: ‘रविवारी कोणती शाळा असते ओ मोदी साहेब’, पुणे दौऱ्यात मोदींच्या...
PM Modi In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुण्यात विविध कामांचं लोकार्पण झालं. यावेळी पंतप्रधानांनी पुणे मेट्रोचं उदघाटन केलं आणि...
१३८ एनआय अॅक्ट अन्वये आरोपीची निर्दोष मुक्तता:
अहमदनगर : येथील मा. न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग कोर्ट नं ४ यांचे न्यायालयात फिर्यादी गर्ल्सगॅलरी तर्फे कलम १३८ एनआय अॅक्ट अन्वये आरोपी...





