पिंपरी महापालिकेत : महाविकास आघाडी उपमहापौर पदाची निवडणुक एकत्र लढविणार

पिंपरी महापालिकेत : महाविकास आघाडी उपमहापौर पदाची निवडणुक एकत्र लढविणार पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौर पदाची निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादीकडून पिंपरीतील नगरसेविका निकिता कदम यांचा उपमहापौर पदासाठी आज (सोमवारी) अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू बनसोडे, स्वीकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर, फजल शेख उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून मोरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे केशव घोळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. पालिकेत भाजपचे बहूमत असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. तर, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकिता कदम यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, 6 नोव्हेंबर 2020 रोजी उपमहापौरपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here