पाणी पुरवठा विस्कळीत: विळद पंपिंग स्टेशन येथील १ पंप नादुरुस्त

दि ४/११/२०२० रोजी शहर पाणी पुरवठा योजनेवरील विळद पंपिंग स्टेशन येथील १ पंप नादुरुस्त झाला असून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.

या कारणांमुळे गुरूवार दि ५/११/२०२० रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . सिद्धार्थ नगर ‘ लालटाकी’ दिल्लीगेट’ चितळे रोड, तोफखाना, नालेगांव ‘ कापड बाजार , आनंदि बाजार, स्टेशन रोड. विनायक नगर, बालिकाश्रम रोड, सावेडी उपनगर, इ भागास पाणी पुरवठा होणार नाही . या भागास शुक्रवार दि ६/११/२०२० रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल .
तसेच शुक्रवार दि ६/११/२०२० रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास उदा . झेंडी गेट’ रामचंद्र खुंट’ हातमपुरा’ रामचंद्र खुंट’ कोठला’ माळीवाडा’, सारसनगर् बुरूडगाव इ . भागास शनिवार दि ७/११/२०२० रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल .
तरी वरिल सर्व परिस्थीती विचारात घेऊन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर कारकस रिने करावा व महानगर पालिकेस सहकार्य करावे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here