‘जिगोलो’चे काम देतो सांगून, खोटया वेबसाइटद्वारे तरुणांची फसवणूक

जिगोलो’चे काम देतो सांगून, खोटया वेबसाइटद्वारे तरुणांची फसवणूक
बिहार – ‘जिगोलो’ म्हणजे देहविक्री किंवा पैशांच्या मोबदल्यात स्त्रियांना शरीरसुख देणारा पुरूष. या जिगोलो’चे काम देतो सांगून, खोटया वेबसाइटद्वारे तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. सावज जाळयात आल्यानंतर तो त्यांना ऑनलाइन पेमेंट करायला लावायचा. खोटया वेबसाइटच्या माध्यमातून त्याने तब्बल २३ लाख रुपये कमावले. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून तो उत्तम नगरचा रहिवाशी आहे. आरोपी मूळचा बिहारचा खागरीयाचा आहे.
उत्तर नगरमध्येच राहणाऱ्या एका तरुणाने पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर हा सर्व घोटाळा उघड झाला. जिगोलो क्लबमध्ये दाखल होण्याच्या नावाखाली आपली ११ हजार रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा आरोप त्या तरुणाने केला. जिगोलो बनण्याची ऑफर देणाऱ्या त्या वेबसाइटची सर्व माहिती त्याने पोलिसांना दिली. तिथे पुरुषांना जिगोलो बनवण्यासाठी निमंत्रण दिले जायचे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
वेबसाइटवर दाखवलेल्या नंबरवर फोन केल्यांतर ऑनलाइन पेमेंट ट्रान्सफर करायला सांगण्यात आले. त्यानंतर जनकपुरीमध्ये भरती करणाऱ्या टीमला भेटायला जा, असा मेसेज दिला. रक्कम अदा केल्यानंतर त्याने पुन्हा फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण फोन लागतच नव्हता. जनकपुरी पोलीस ठाण्याच्या सायबर टीमने फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला असे डीसीपी दीपक पुरोहित यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here