अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने रुग्णसेविकेस मारहाण; शहरातील घटना

मानवता धर्म पाळत रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांच्या कोरोना काळात सर्वत्र गौरव करण्यात आला. मात्र दुसरीकडे शहरातील एका हॉस्पिटलमध्ये चक्क रुग्णसेविकेला मारहाण करीत विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान पिडीत महिलेने फिर्याद दिली असल्याने याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सुरेश रमेश मिसाळ, गणेश संजय पवार, प्रशांत प्रदीप दळवी, मयुरी सुरज मिसाळ, भारती रमेश मिसाळ,गौरी सचिन मिसाळ, लक्ष्मी उत्तम मिसाळ, वर्षा प्रशांत मिसाळ (सर्व रा. नालेगाव, नगर) यांच्याविरूद्ध विनयभंग, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच तोफखाना पोलिसांनी आरोपी सुरेश मिसाळ, गणेश पवार व प्रशांत दळवी यांना अटक केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, फिर्यादी महिला या शहरातील एका खाजगी रूग्णालयात नर्स म्हणून काम करतात.
सुरेश मिसाळ याने फिर्यादी यांच्याकडे वेळोवेळी अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती. फिर्यादी यांनी त्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून सुरेश याने फिर्यादीच्या घरात घुसून त्यांच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. तसेच, इतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या बहिणीला मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here