* क्रिकेटपटूचा पंतप्रधान बनलेले इमरान खान यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये सर्व विरोधी पक्ष एकवटले असताना, आता त्यातून धडा घेण्याऐवजी, खान यांचे सरकार सातत्याने जागतिक पातळीवर देशाची नाचक्की आणि फटफजिती करुन घेत आहे. ? फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनी इस्लामिक दहशतवादावर एक वक्तव्य केले होते. यावरून मुस्लिम राष्ट्रांनी तीव्र निषेध व्यक्त केला. पाकिस्ताननेही संसदेत निषेध प्रस्ताव मांडला. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी आणखी एक प्रस्ताव देत म्हटले की, फ्रान्समधील पाकिस्तानी राजदूताला माघारी का बोलवू नये. ? पाकिस्तानच्या संसदेत या प्रस्तावावर बहुमताने संमती देण्यात आली. पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तहरीक ए इन्साफ’सह विरोधी पक्षांना एकमुखाने प्रस्तावाला होकार दिला. ? मात्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनाच, आपल्या देशाचा फ्रान्समध्ये राजदूतच नाही, याची कल्पना नसल्याचे उघड झाले आहे. तीन महिन्यांपूर्वीचे तेथील राजदूताला, मोइन-उल-हक यांना पाकिस्तानने माघारी बोलावले होते. ? पाकिस्तान सरकारनेच त्यांची बदली करत चीनमधील राजदूत नियुक्त केले होते. सध्या मोहम्मद अजिज काझी हे पाकिस्तानच्या पॅरिस येथील दुतावासाचे उप प्रमुख आहेत. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर फटफजिती झाली आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
आमचा लढा सुरूच राहणार ,किरीट सोमय्यांचा राऊतांवर पलटवार
मुंबई - शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपचे माजी खासदार किरीट...
“इलॉन मस्कने घाबरू नका”: अश्नीर ग्रोव्हरचा संस्थापकांना सल्ला
नवी दिल्ली: नवीन बॉस इलॉन मस्कने पदभार स्वीकारल्यापासून Twitter वर अनेक नाट्यमय घटना घडल्या आहेत: जवळपास निम्म्या...
माजी नगरसेवक मुद्दसर शेख यांच्या निवास्थानी सत्यजित तांबे यांनी दिली भेट.
शहरात पदवीधर मतदार संघाच्या प्रचाराची सुरुवात.
अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवार सुधीर...
नेतेचा विधासभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी केले विष प्राशन !!!
या बाबत सविस्तर वृत्त असे की कन्नड विधासभा मतदार संघात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा त्यांच्याच माजी...



