
पुणे महापालिकेत झालेल्या पराभवानंतर तात्काळ अजित पवार यांनी आज पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. बैठकी दरम्यान, अजित पवार यांनी जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवारांच्या बैठका सुद्धा घेतल्या. या बैठकीला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होते. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नाचे उत्तरे मिळण्यापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्हा युवक अध्यक्षपदी निलेश थिगळे यांची नियुक्ती करणयात आली आहे. गेल्या ९ वर्षांपासून पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून नित थिगळे कार्यर्त होते. थिगळे हे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरचे आहेत. संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आणि युवकांमध्ये असलेली लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांच्यावर आता अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निलेश थिगळे यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र ऐनवेळी पक्षप्रमुख अजित पवार यांनी थिगळे यांच्यावर जिल्हा युवक संघटनेची मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.



