
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे. दरम्यान, हा हप्ता सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाहीये. सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने लाभार्थी महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, ज्या महिलांनी केवायसी केले आहेत. त्यांच्याही खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे विविध जिल्ह्यातील महिलांनी मोर्चे काढले आहेत. लाडकी बहीण योजनेचा मागच्या महिन्याचा हप्ता जवळपास अनेक महिलांना मिळालेला नाही. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील ३० हजार महिलांचा लाभ बंद केला आहे. ई केवायसीमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांचा लाभथांबवला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लाभ बंद झाल्याने महिला थेट बुलढाणा जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात गेल्या आहेत. ई केवायसीमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
वाशिममध्येही अनेक महिलांचा लाभ बंद केला आहे. ई केवायसी करुनही नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, असं महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या आहेत.
हिंगोलीतील महिलांचाही उद्रेक
हिंगोलीतील महिलांचीही अशीच परिस्थिती आहे. सेनगाव औंढा, कळमनुरी, वसमत, आणि हिंगोली अशा पाच तालुक्यातील हजारो महिलांचा लाभ बंद झाला आहे. यासंदर्भात महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.
यवतमाळमध्येही हजारो महिलांचा लाभ बंद29लाडकी बहीण योजनेत यवतमाळमधील महिलांचा लाभ बंद झाला आहे. यवतमाळमधील सहा लाख महिला पात्र ठरल्या होत्या. मध्यंतरी पडताळणी करण्यात आली तेव्हा निकषात न बसणाऱ्या महिलांचे लाभ बंद केले. त्यानंतर आता ईकेवायसी केल्यानंतरही अनेक महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यवतमाळमधील केवायसी पुन्हा सुरु करावी, असं सांगितलं आहे.





