
सोन्याचे द्र गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. सोन्याचे दर मागच्या आठवड्याभरातही खूप वाढले आहे. एका आठवड्याभरात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३३२० रुपयांनी वाढ झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ३०५० रुपयांनी वाढले आहेत.
सध्या सोन्याचे दर २४ कॅरेटमागे १४३९३० रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर् ४६०३.५१ डॉलर प्रति औंस आहे. सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढताना दिसत आहे. तुम्ही अठवड्याभरात सोन्याचे दर कितीने वाढले हे जाणून घ्या.
सध्या मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे १४३७८० रुपये आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर १३१८०० रुपये आहेत. सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहे.
पुण्यातील सोन्याचे दर..
पुण्यातील २४ कॅरेट सोन्याचे दर १४३७८० रुपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे द १४३७८० रुपये आहेत. या दरातदेखील वाढ झाली आहे.
दिल्लीतील दर..
२४ कॅरेट सोन्याचे दर १४३९३० रुपये आहेत तर २२ कॅरेटचे दर १३१९५० रुपये आहेत.
पअमेरिकेत महागाई कमी झाल्याने फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली आहे. यामुळे सोने-चांदीच्या गुंतवणूकीत वाढ झाली आहे. यामुळेदेखील सोने-चांदीचे दर वाढताना दिसत आहे.
चांदीचे दरदेखील मागच्या आठवड्यात वाढले आहेत. एका आठवड्यात जवळपास ३५००० रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचे दर आज १ किलोमागे २९५००० रुपये आहेत. चांदीचे दर २०२६ मध्ये आतापर्यंत २२.४ टक्क्यांनी वाढले आहेत.




