श्रीरामपूर डाक विभाग पुणे क्षेत्रात अव्वल; डिजिटल सेवेला नागरिकांची पहिली पसंती !..

    21

    भारतीय डाक विभागाने कात टाकली असून आता टपाल सेवा ‘हायटेक’ झाली आहे. श्रीरामपूर पोस्टल डिव्हिजनने डिसेंबर २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पुणे परिक्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

    कामगिरीचा आढावा (डिसेंबर २०२५):

    एकूण व्यवहारः ५१,५०९

    डिजिटल व्यवहारः २२,६५८ (४३.९९%)

    डिजिटल उलाढालः १३.३३ लाख रुपये श्रीरामपूर विभागाचे डाक अधीक्षक श्री. उमेश जनवाडे यांनी सांगितले की, “डिजिटल व्यवहारामुळे सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुरक्षित झाली आहे. हे यश आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सांघिक मेहनतीचे फळ आहे.

    “नागरिकांना आवाहनः आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये व्यवहार करताना रोख रकमेऐवजी (Cash) खालील पर्यायांचा वापर कराःQR कोड स्कॅन (UPI)डेबिट कार्ड / क्रेडिट कार्डआपला वेळ वाचवा, डिजिटल व्हा !

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here