
भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार
शहराचे प्रथम माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी सुनिता फुलसौंदर यांनी प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, मीना चोपडा आदींनी आपले उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दाखल केले आहे. या प्रभागातून भगवान फुलसौंदर व त्यांच्या पत्नी आतापर्यंत शिवसेनेकडून निवडून आल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. या प्रभागामध्ये गणेश भोसले, सुनिता फुलसौंदर, मीनाताई चोपडा, प्रकाश भागानगरे असे राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले आहेत.




