जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा मुहूर्त ठरला; २ दिवसांत घोषणा होणार?

    21

    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका गेल्या काही वर्षांपासून झाल्याच नव्हत्या. आता या रखडलेल्या निवडणुकीला मुहूर्त लागलाय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत. आधी राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी पार पडलीय. नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यातच आता दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा मुहूर्त ठरलाय. याबाबतची घोषणा दोन दिवसातच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका डिसेंबर महिन्यातच पार पडणार आहेत. तर तिसऱ्या टप्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. येत्या २० ते २५ दिवसात या निवडणुका होतील, अशी शक्यता आहे.

    दरम्यान या निवडणुकीची घोषणा लवकरच राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. यामुळे पुढच्या महिन्यात होत असलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या तिसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते २० डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता होती.त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका २० डिसेंबरनंतर होतील, अशी शक्यता होती. पण आता यात बदल करण्यात आलाय. दोन दिवसात निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here