नगर तालुक्यातील खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांनी घेतली आक्रमक भूमिका

    19

    अहिल्यानगर जिल्ह्यातील खारेकर्जुने येथील गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. रविवारी रात्री एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला तर दुसरा बिबट्या विहिरीत आढळून आला. विहिरीत पडलेल्या नरभक्षक बिबट्याला ठारा मारा अन्यथा आम्ही फाशी घेऊ अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली. महिलांनीही बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यास विरोध केला. डीएनए केल्यानंतर बिबट्याला ठार मारण्यात येईल असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, वन विभाग, पोलिस, नागरिकांच्या मदतीने विहिरीत पिंजा सोडून बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. २४ तासात दोन बिबटे जेरबंद करण्यात आले.

    दरम्यान सोमवारी दुपारी खातगाव रोडला पानसंबळ वस्तीवर एका विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. बिबट्या विहिरीत पडल्याचे ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. तसेच बिबट्याला विहिरीतून पकडण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठीं वन विभागाचे पथक दाखल झाले. पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी पिंजराही आणला. बिबट्याचा डीएनए केल्यानंबर बिबट्याला मारण्याबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन वनविभागाने नागरिकांना दिले. त्यानंतर वन विभाग, पोलिस यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू करत बिबट्याला बाहेर काढले.

    बिबट्याने खारेकर्जुने येथील मुलीला ठार मारले. निंबळकमध्ये मुलावर हल्ला केला. पाळीव प्राण्यांवर हल्ले केले. त्यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. विहिरीत पडलेला बिबट्या नरभक्षक आहे. त्या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढू नका, ठार मारा अशी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेशही दिले असल्यामुळे बिबट्याला विहिरीतून बाहेर काढू नका, बिबट्याला ठार मारा अर्शी मागणी लावून धरली. दुपारी वन विभाग, पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू करत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here