महायुती तुटली; राजकारण फिरल, भाजप-राष्ट्रवादीचा शिंदेंना दे धक्का

    110

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. जागोजागी युती, आघाडीबाबत केल्या जात आहेत, तर काही ठिकाणी युत्या तुटू लागल्या आहेत. स्थानिक पातळीवर युती झाली तर युती करावी नाहीतर मैत्रीपूर्ण लढत लढावी, असे महायुतीमधील पक्ष श्रेष्ठींनी सुचना केल्या आहेत.

    या सुचनेमुळे युती कमी आणि बिघाडी जास्त होताना दिसत आहे. तशीच एका बातमी रायगडमधून येत आहे. येथे महायुतीत् बिघाडी झालीय. शिवसेनेला डाव सत्ता स्थापनेपासून राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. महाडमध्ये शिवसेना शिंदे गटाला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती केर्लीय. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी याबाबत माहिती दिलीय. महाड नगर पालिकेत १५ जागा राष्ट्रवादी आणि 5 जागा भाजपला देण्यात येतील असं गणित ठरल्याची माहिती माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिलीय. तर नगराध्यक्ष पदाबाबत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे घोषणा करणार आहेत.

    आगामी नालिका निवडणुकीच्या आधी महायुतीत मोठा राजकीय भूकंप झालाय. शिवसैना शिंदे गटाला वगळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) युती करण्याची घोषणा केली आहे. सर्वांगीण विकासाकरता आणि लोकांच्या असलेल्या समस्या सोडविण्याकरता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष आगामौ निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार असल्याची माहिती माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली.

    यंदाच्या स्थानिक पातळीवरील निवडणुका वेगळ्या स्वरुपाच्या असणार आहेत. महायुतीमधील तिन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी आपला पक्ष सोडून आपल्या मित्रपक्षात प्रवेश केला. दुसरीकडे मविआमधील अनेक नेत्यांनी महायुतींत प्रवेश केलाय.

    दुसरीकडे सोलापुरात एकनाथ शिंदे आणि शरद पवार गट एकत्र येणार आहेत. त्यामुळे रायगडनंतर येथे नवं राजकीय समीकरण उदयास येत आहे. आगामी कुर्जुवाडी नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या पक्षात युती झालीय. ही युती माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्य मध्यस्थीने युती झालीय. दोन्ही पक्षांमध्ये ठरलेल्या रणनीतीनुसार, प्रत्येकी दहा जागांवर उमेदवार उभे राहणार आहेत. तसेच नगराध्यक्षपद शिवसेनेला देण्याचा निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितलं.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here