देवेंद्र फडणवीस

ऐन दिवाळीत राज्यात राजकीय फटाके फुटू लागले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडला भाजपा स्वबळावर लढणार आहे. जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक तिथे वेगळे लढू. मुंबईत मात्र महायुती म्हणूनच लढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये ते बोलत होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई वगळता इतर महापालिकेत भाजपा स्वबळावर लढेल. निकालानंतर काय करायचे ते ठरवू. मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहे. मुंबईत एकत्र पण राज्यात वेगळे लढून निकालानंतर एकत्र येऊ असं त्यांनी सांगितले. त्याशिवाय मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देणार आहोत. लोकसभेला महाविकास आघाडीचा कसा फायदा झाला, त्याचे पुरावे देणार असं फडणवीसांनी म्हटलं.




