‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा

    37

    मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या संदर्भात बोलताना मनोज जरांगे यांनी म्हटलं की, “मग तुम्ही बंजारा समाजातून आरक्षण का घेतलं? बरं झालं आता बीड जिल्ह्यातील मराठे शहाणे होतील. ते (धनंजय मुंडे) मला बोलत असले तरी मला काही होणार नाही”, असं मनोज जरांगेंनी म्हटलं.

    धनंजय मुंडे यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना जरांगे यांनी म्हटलं की, “तुम्ही माझ्या नादी लागू नका, मला तुम्ही (माध्यमे) त्यांच्याबाबत प्रश्नहीँ विचारू नका. आता एकदाच सांगतो, माझ्या नादी लागू नको. शहाणपणा करायचा नाही. मी दादांना (अजित पवार) वैगेरे मोजत नसतो. रक्तांनी हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही. जर माझ्या नादी लागलात तर मी तुमच्या दोघांचाही (पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे) बाजा उठवणार, मी आता हे क्लिअर सांगत आहे. तुमच्यामुळे (धनंजय मुंडे) मी अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन. मी जातील कट्टर मानणारा व्यक्ती आहे, तुम्ही काहीच नाहीत. मी ऐकून घेतोय तर शहाणपणा करायचा नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

    “आता आगामी निवडणुकीत कोण-कोण मराठे तिकडून उभे राहत आहेत, ते देखील आम्ही पाहणार आहोत. धनंजय मुंडे ज्यांच्या-ज्यांच्या प्रचाराला येणार, त्या उमेदवाराला आम्ही निवडणुकीत पाडणार, मग तो उमेदवार मराठ्यांचा असला तरीही. आमच्या लेकरांना आरक्षण द्यायला हे विरोध करत आहेत, थोडंफार काही वाटलं पाहिजे”, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.

    “तुमच्या दोघांनाही मी सांगतो, तुम्ही शहाणे अॅसतान तर तुमच्या दोघांच्याही हातून आणखी वेळ गेलेली नाही. तुम्ही माझ्या आणि माझ्या जातीच्या नादी लागू नका. तुम्ही छगन भुजबळ यांचं ऐकून माझ्या नादी लागू नका. अन्यथा तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या आणि माझ्या नादी लागू नका, खूप बेक्कार होईल, राजकारणातील तुमचं नामोनिशाण मिटून जाईल”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here