
शांतिलाल मुथा फउंडेशन, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित चास केंद्रस्तरीय मूल्यवर्धन 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षकांना मार्गदर्शन करताना पदमश्री डॉ. पोपटराव पवार यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि शॉर्टकटच्या आधुनिक युगात मूल्यवर्धन प्रशिक्षणामुळे विद्यार्थी जबाबदार, संवेदनशील व सक्षम नागरिक बनतील तसेच संस्कारक्षम पिढी निर्माण करण्याकरीता तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक कौशल्ये, ज्ञान, संस्कारक्षम मुल्ये रुजवण्यात येतील असे प्रतिपादन केले. व्यसन मुक्ती, पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, कुटुंब व्यवस्था, निसर्ग संवर्धन, तापमान बदल, नवीन कौशल्ये आणि ज्ञान मिळवल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल, मूल्यांची श्रीमंती येऊन त्यांना कार्यबलासाठी तयार केले जाईल. चास केंद्रातील पहिली ते आठवीला शिकवणारे सर्व शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवणारा हा उपक्रम आहे, असेही ते म्हणाले, तीन दिवशीय प्रशिक्षणात शिक्षकांनी विविध उपक्रम सादर केले, या तीन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमात केडगाव बिटच्या शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला साठे, चास केंद्राचे केंद्रप्रमुख अंबादास गारुडकर, केंद्रप्रमुख उदार साहेब, तज्ञमार्गदर्शक विजय मिसाळ, मुख्याध्यापक बाबा जाधव, सुलभक बबनराव औटी, सुलभक प्रशांत लाटे, विजय ठाणगे, प्रविण शेरकर, शोभाताई पवार, सुमेधा शेजूळ, शुभांगी महापुरे, आशा कापरे, सतीश मुसळे, शिवराज पाटील, किरण सांगळे, रामदास पानसरे, कैलास खैरे, नंदकुमार झावरे तसेच चास केंद्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.