
धक्कादायक अशी घटना पुढे आली असून ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. पाकिस्तानने यादरम्यान इस्रायलसोबत मोठा पंगा घेतलाय. आता इस्रायल देखील पाकिस्तानच्या विरोधात मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले. इस्रायलने थेट पाकिस्तानच्या एका जहाजावर हल्ला केला. हा हल्ला लाल समुद्रात करण्यात आला.पाकिस्तानच्या जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानी जहाजावर झालेल्या हल्ल्याची पुष्टी केली असून इस्रायली हल्ल्यात पाकिस्तानी कर्मचारी मारले गेल्याचे मान्य केले. गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी स्पष्ट म्हटले की, जहाज हुथी बंडखोरांच्या तावडीतून सुरक्षित बाहेर आलंय. या जहाजावर 27 क्रू मेंबर्स होती, यापैकी 24 जण हे पाकिस्तानी नागरिक होते. बाकी, श्रीलंकन आणि नेपाळी कामगार या जहाजावर होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जहाज 17 सप्टेंबर 2025 रोजी रास अल-इसा बंदरात पोहोचले होते. सध्या ते हुथींच्या नियंत्रणाखाली आहे.
एका इस्रायली ड्रोनने टँकरला लक्ष्य केले. या हल्ल्यामुळे जहाजाच्या एलपीजीमध्ये मोठा स्फोट झाला. क्रू आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले आणि जहाजातील सर्वजण वाचले. मात्र, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी जहाजावर नियंत्रण मिळवत परिस्थिती हाताळली. हल्ल्यानंतर लगेचच हुथी बंडखोरांच्या बोटी घटनास्थळी पोहोचल्या असल्याचेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. त्यांनी जहाजावरील कर्मचाऱ्यांना अनेक दिवस ओलीस ठेवले होते.
पाकिस्तानच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोठी प्रयत्न केली. ओमानमधील पाकिस्तानी राजदूत नवीद बुखारी, सौदी अरेबियाच्या सुरक्षा संस्था यांनीही त्यांना मदत केली. यादरम्यान सौदी अरेबियाने पाकिस्तानची मोठी मदत केली आणि लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ज्याप्रकारे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला उत्तर दिले त्यानंतर पाकिस्तानने थेट सौदी अरेबियामध्ये जाऊन सुरक्षा करार केली. आता पाकिस्तानवर हल्ला म्हणजे सौदी अरेबियावर हल्ला समजला जाणार आहे.