
बीडच्या गेवराईतील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह बार्शीच्या सासुरे गावात आढळला. सुरूवातीला त्यांनी डोक्यात गोळ्या गोळ्या आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर घटनेच्या विविध बाजू समोर येत आहेत. सोलापुरातील नर्तकेशी असलेले प्रेमलंबंध समोर आल्यानंतर घातपाताचाही संशय व्यक्त केला जात आहे.
पूजा गायकवाड हिचा अटक होण्यापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.पूजा गायकवाड आणि गोविंद बर्गे यांचे प्रेमसंबंध होते. पूजा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. गोविंद यांच्या मृत्यूनंतर पूजाचा एक रिल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आठवडाभरापूर्वी तिनं हा रिल शेअर केला होता. या इन्स्टा रिलमध्ये पुजाच्या हाताच्या चारही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहे.
तसेच तिच्या हातात पाचशेची करकरीत नोट दिसत आहे. रिलमध्ये ती एका डायलॉगची लिप्सिंग करत आहे. ‘मला या माणसाची विचित्र सवय लागलीय. माझ्यातून कायमचा गेला तर, माझं फार अवघड होईल’, या ऑडिओवर पूजा लिप्सिंग करताना दिसत आहे.
मात्र, या रिल आणि गोविंद बर्गे यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का? याची चर्चा आता र्बोडसह सोलापुरात सुरू आहे. गोविंद यांच्या मृत्यूपूर्वी दोघांचे वाद झाले होते. पूजा गेल्या काही दिवसांपासून गोविंद यांच्यासोबत बोलत नव्हती. दरम्यान, या प्रकरणात पूजा गायकवाड सध्या ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. आता पोलीस चौकशीतून काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल.