बीड मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी बीड रेल्वेच्या नकाशावर; बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे

    38

    बीड रेल्वेमार्गापासून कोसो दूर असलेले बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

    फलटण – लोणंद रेल्वे मार्गावरील काम

    फलटण ते लोणंद या रेल्वे मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करावीत. बारामती रेल्वे स्थानकाच्या कामाला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्या. तसेच कामाला गती देऊन पुढील काळात सुसज्ज रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

    कसा असेल रेल्वे मार्ग

    44रेल्वे मार्गाची एकूण लांबी २६१.२५ किलोमीटर, जमिनीचे एकूण भूसंपादन १,८२२.१६८ हेक्टर, रेल्वे खालील एकूण पूल १३०, रेल्वे वरील पूल ६५, मोठ्या पुलांची संख्या ६५, छोटे पूल ३०२.द्वितीय प्रशासकीय मान्यतेनुसार प्रकल्पाची एकूण किंमत ४,८०५.१७ कोटी, प्रकल्पाच्या समप्रमाणात ५०:५० टक्के हिस्सा नुसार केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी हिस्सा २,४०२.५९ कोटी रुपये.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here