
महाराष्ट्रात मराठा आरक्षण हा विषय चांगलाच गाजताना दिसत आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात मोठे आंदोलन केले. या आंदोलनावेळी मनोज जरांगे पाटील यांनी काही मागण्या ठेवल्या होत्या.
त्यातील बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली आहे. यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद गॅझेटचा जीआर हाती पडताच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील एक गंभीर आरोप केला आहे.
हे लोक कधीच आपल्या बाजून बोललेले नाहीत.
मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाबद्दल येत असलेल्या विविध जीआरवरुन होणाऱ्या टीकांना प्रत्युत्तर दिले. त्यांना ज्या आरक्षणावर राजकारण करायचं होतं, त्यांना ज्या गॅझेटवर राजकारण करायचं होतं. ज्याच्यावर ते आपलं जीवन जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आलं आहे. हे लोक कधीच आपल्या बाजून बोललेले नाहीत. कोणताही निर्णय झाला की मराठा समाजाला वाटतं की हे करायला नको होतं, यानंतर ८-१५ दिवसांनी वाटतं की पाटलांनी केलं तेच बरोबर केलं. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.