मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांचा टीमला यश आलं आहे. यामध्ये पोलिसांनी बॉलिवूडमधील आंतरराष्ट्रीय बेली डान्सरसह दोन टीव्ही मालिकेतील अभिनेत्रींना ताब्यात घेतलं आहे.
एका 5 स्टार हॉटेलमध्ये दोन मालिकांमधील अभिनेत्रींचा 10 लाखांसाठी सौदा केला जात असताना पोलिसांनी छापा टाकून त्यांना पकडलं आहे.
गोरेगावमधील 5 स्टार हॉटेलमध्ये पोलिसांनी वेशांतर केलं आणि ग्राहक म्हणून या ठिकाणी सापळा रचला आणि इथे चालू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी राखी सावंतची मैत्रिण आणि बॉलिवूडची अभिनेत्री हिच्यासह तीन तरुणींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.





