सुपा एमआयडीसीमध्ये ५०० कोटींच्या गुतंवणुकीतून ३२ एकरावर उभा राहणार मद्य निर्मिती उद्योग, ५०० तरूणांना मिळणार रोजगार..

    65

    नगर- नगर पुणे महामार्गावरील सुपा (ता. पारनेर) औद्योगिक वसाहतीतील जपानी इंडस्ट्रीज पार्कमध्ये कार्ल्सबर्ग हा मद्य निर्मितीचा उद्योग ५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ३२ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून ५०० जणांना रोजगार उपलब्ध होईल. त्यासाठी या उद्योग समूहाकडून जागेचा आलेला प्रस्ताव हा मुंबई येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्यालयात पाठवण्यात आला आहे.दरम्यान, गेल्या ८ वर्षांत या वसाहतीत आंतराष्ट्रीय स्तरावरील चीन, जपान या देशांसह भारतातील मोठ्या ३३ उद्योगांनी गुंतवणूक केली. त्यातूनच औद्योगिक वसाहतीत २ हजार १३५ कोटींची गुंतवणूक झाली. यामध्ये श्रीलंकेचा किक्रेटर मुथय्या मुरलीधरनच्या सिलॉन ब्रव्हरेजेस या उद्योगाने १ हजार ६४५ कोटींची गुंतवणूक केली.तर पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील एसपीएमएल इन्फ्रा या उद्योगाने ५०० कोटींची गुंतवणूक केली. त्यानंतरआता कार्ल्सबर्ग हा बिअर निर्मितीचा उद्योग सुरू होणार आहे. कार्ल्सबर्गकडून छत्रपती संभाजीनगर येथील औद्योगिक वसाहतीतदेखील बिअर निर्मिती होते. आता अहिल्यानगर जिल्ह्यात हा प्रकल्प येत असल्याने स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. यामुळे अर्थिक उलाढालही होणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here