अहिल्यानगर जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर; आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा

    134

    अहिल्यानगर आगामी जिल्हा परिषद प पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या गट-गणांच्या प्रारूप रचनेवरील हरकतींवर सुनावणी होऊन अंतिम गट-गण रचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आली आहे. अंतिम गट-गण रचना जाहीर झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे. दरम्यान, अनेकांनी घेतलेल्या हरकतीमध्ये काहींच्या तक्रारी ग्राह्य धरत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गट-गणांची मोडतोड करण्यात आल्यानें अहिल्यानगर जिल्ह्यात कही खुशी कही गम अशीच स्थिती पहावयास मिळत आहे.

    जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या 92 हरक्तींवर सुनावणी झाली. यातील जामखेड, पारनेर, कोपरगाव, श्रीगोंद्यातील 23 हरकती मान्य करण्यात आल्या होत्या. 69 हरकती फेटाळण्यात आल्या. 14 जुलैला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण याचा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला होता. त्यावर 21 जुलैपर्यंत हरकती व सूचना देण्याची अंतिम मुदत होती. प्रारूप प्रभाग रचना जाहीर करताना जिल्हा परिषदेचे 75 व पंचायत समितीचे 150 गणांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची नावे व नकाशा जाहीर करण्यात आले होते. ही रचना 2011 च्या लोकसंख्येच्या आधारावर असून झिक्झक पद्धतीने हा आराखडा तयार करण आलेला आहे.अकोल्याच्या समशेरपूरपासून ते जामखेडच्या खर्डापर्यंत असा हा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर हरकती व सूचनांचा पाऊस पडेल असे वाटले होते. प्रत्यक्षात दिलेल्या मुदती 92 तक्रारी आल्या होत्या.

    दाखल झालेल्या हरकतींपैकी जामखेड, पारनेर, कोपरगाव व श्रीगोंदा तालुक्यातील 23 हरकती मान्य झाल्या असून उर्वरित उर्वरित 69 हरकती फेटाळण्यात आल्या होत्या. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मान्यतेने अंतिम गट गण रचना जाहीर करण्यात आली आहे.आरक्षणाकडे इच्छुकांच्या नजरा आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे.

    परंतु, आपले गाँव कोणत्या गटात आहे. याकडे लक्ष लागले होते. आता लि हात. जिल्हाधिकाऱ्यांनी गट आणि गणांची अंतिम याकड रचना जाहीर केली आहे. त्यामुळे जाहीर झालेल्या गटात व गणात कोणते आरक्षण पडते याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.

    गट गण जाहीर झालेल्याने लवकरच आरक्षणही जाहीर होईल असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.पारनेरः अंतिम गट-गणातील गावे (कंसात गणांची नावे) -* टाकळी ढोकेश्वर गट (कर्जुले हर्या) कर्जुले हर्या, पिंपळगाव रोठा, नांदूर पठार, सावरगाव पोख्री, कातळवेढा, डोंगरवाड़ी, पळसपूर, हर्या, पिंपळगाव रोठा, नांदूर पठार, सावरगाव, पोखरी, वरी, कातळवेढा, डोंगरवाडी, पळसपूर, म्हसोबा झाप, वारणवाडी, कारेगाव, गारगंडी, कासारे. * (टाकळी ढोकेश्वर): टाकळी ढोकेश्वर, वडगाव सावताळ, गाजदीपूर, वासुंदे, ढोकी, देसवडे, खडकवाडी, मांडवे खुर्द, भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल * ढवळपुरी गट (ढवळपुरी) : ढवळपुरी, भनगडेवाडी, पळशी, वनकुटे, तास, धोत्रे बु., धोत्रे खु., हिवरे कोरडा, काळकूप. * (भाळवणी): भाळवणी, माळकूप, पाडळी कान्हूर, वडगाव आमली, भांडगाव, जामगाव, सारोळा आडवाई, दैठणे गुंजाळ, लोणी हवेली, गोरेगाव, डिकसळ. * जवळा गट (कान्हूर पठार): कान्हूर पठार, दरोडी, पिंपरी पठार, विरोली, हत्तलखिंडी, पुणेवाडी, पिंपळगाव तुर्क, वेसदरे, वडगावदर्या, पाडळीदर्या, अक्कलवाडी, करंदी, किन्ही, बहिरोबावाडी, वडझिरे, शेरी कोलदरा, जाधववाडी, बाभुळवाढे. * (जवळा) *: जवळा, सांगवी सूर्या, गॉजीभोयरे, देवीभोयरे, चिंचोली, पिंपरी जलसेन, वडुले, सिद्धेश्वरवाडी, पिंपळनेर, पानोली. * निघोज गट (अळकुटी): अळकुटी, वडनेर बु., चोंभूत, रेणवडी, शिरापूर, शेरीकासारे, कळस, पाडळी आळे, रांधे, पाबळ, लोणी मावळा, म्हस्केवाडी, गारखिंडी. * (निघोज): निघोज, मोरवाडी, ढवणवाडी, वडगाव गुंड, शिरसुले, पठारवाडी, गुणोरे, गाडीलगाव, कोहोकडी, म्हस्के खु., राळेगण थेरपाळ, हकिगतपूर, माजमपूर. * सुपा गट (वाडेगव्हाण): वाडेगव्हाण, राळेगणसिद्धी, कुरुंद, यादववाडी, नारायणगव्हाण, पाडळी राजणगाव, कळमकरवाडी, पळवे बु., कडूस, पळवे खु., मावळेवाडी, जातेगाव, म्हसणे, सुलतानपूर, वडनेर हवेली, गटेवाडी, घाणेगाव वाघुंडे खु., वाघुंडे बु. * (सुपा): सुपा, हूंगा,

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here