
नगर शहरातील झेंडीगेट परिसरात अबुतलहा अकिल शेख या तरुणाला नऊ जणांनी बेदम मारहाण केली असून लाकडी दांडके, कोयते, बंदुकीचा वापर करून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले शेख यांच्या फिर्यादीवरून झेंडीगेट परिसरातील माजी नगरसेवक नजिर अब्दुलरज्जाक जहागीरदार ऊर्फ नज्जु पहिलवान, इस्नान बशीर जहागीरदार, इम्तियाज जहागीरदार ऊर्फ आर डी एक्स, रशिद अब्दुल जहागीरदार ऊर्फ रशिद दंडा, अकिब रशिद जहागीरदार, अश्रफ नदिम जहागीरदार, फैजान निसार जहागीदार, जिशान इम्तियाज जहागीरदार, मोईन आलम जहागीरदार यांच्या विरोधात बीएनएस. २०२३ चे कलम ११९ (१), ११८(१), ११५(२), १२६(२), ३५१(२), ३५२ १८९(२), १९१(२), १९१(३), १९० सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह आमं अॅक्ट ३/२५ प्रमाणे, कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.