
◼️ नवी मुंबईतील ऐरोली येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रामध्ये देशाची 60% डेटा सेंटर क्षमता उभी राहिली आहे.
◼️ डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी डेटा सेंटर महत्त्वाचे मानले जात असल्याने राज्यात या क्षेत्रासोबतच लॉजिस्टिक्स आणि इतर उद्योगांमध्ये तब्बल ₹20,000 कोटींची नवी गुंतवणूक होणार आहे.
◼️ सिंगापूरच्या मेपलट्री इन्व्हेस्टमेंट्स प्रा.लि. आणि महाराष्ट्र शासन यांच्यात जेएनपीए, उरण येथे सामंजस्य करार (MoU) झाला. या कराराअंतर्गत ₹3000 कोटींची गुंतवणूक होणार असून, मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर औद्योगिक परिसरात थेट 5000 रोजगार संधी उपलब्ध होतील.
◼️ या कार्यक्रमाला सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग, सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सिओ, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
◼️ याशिवाय, सिंगापूरच्या तमासॅक कंपनीने मणिपाल विकत घेतले असून, मणिपालसोबत नागपूरमध्ये ₹700 कोटींचे आधुनिक रुग्णालय बांधण्याचा करार झाला आहे.





