
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझीलाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरु झाली. या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. आतापर्यंत या योजनेचे एकूण 12 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. जुलै 2024 ते जून 2025 या काळातील एकूण 12 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.
तसेच जुलै महिन्याचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची बातमी समोर आली आहे. येत्या दोन दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा होणार आहे.
याच रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 8 ऑगस्ट पासून जुलै महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित केले जातील अशी माहिती सरकारमधील मंत्र्यांकडून देण्यात आली आहे.
शासनाचा नवा निर्णय काय ?
महाराष्ट्र राज्य शासनाने आता वैयक्तिक लाभांच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जर लाभार्थ्यांनी सलग तीन महिने लाभाची रक्कम खात्यातून काढली नाही तर ते पैसे परत सरकार दरबारी जमा होऊ शकतात.
26राज्य शासनाकडून निराधार महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना सुरु करण्यात आली आहे. याचं संजय गांधी निराधार योजनेच्या आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी जर सलग तीन महिने खात्यातून पैसे काढले नाहीत तर ते पैसे पुन्हा सरकारकडे जमा होणार आहेत.
संजय गांधी निराधार योजनेच्या आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना वेळोवेळी काही कागदपत्रांची पूर्तता सुद्धा करावी लागते. याशिवाय आता राज्य सरकारने जर या वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या लाभार्थ्यांनी तीन महिने पैसे काढले नाहीत तर त्यांचे पैसे परत एकदा सरकारकडे जमा होतील असे आदेश काढले आहेत.
लाडक्या बहिणींनाही फटका बसणार का ?
सरकारकडून वैयक्तिक लाभाच्या सरकारी योजनांचे पैसे सलग तीन महिने काढले नाहीत तर ते पैसे सरकार दरबारी जमा करण्याचे आदेश जारी केले आहेत आणि यामुळे लाडक्या बहिणी देखील संभ्रमात आल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील तीन महिने काढले नाही तर ते पैसे पण सरकारकडे जमा होऊ शकतात का? असा सवाल आता महिलांकडून उपस्थित होतोय. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या संदर्भात अजूनही सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.





