
दिनांक- २८/०७/२०२५ शेवगांव या बाबत सविस्तर वृत्त असे की यातील पिडीतेच्या फिर्यादीवरुन दिनांक ०८/०७/२०२५ रोजी सायंकाळी १८/५५ वाचे सुमारास यातील आरोपीत नामे १) आण्णासाहेब ऊर्फ तान्हाजी प्रल्हाद आंधळे याने व त्याचे नातेवाईक २) प्रविण प्रल्हाद आंधळे ३) जनाबाई प्रल्हाद आंधळे वरील सर्व रा रा. सोनेसांगवी ता. शेवगाव जि. अहिल्यानगर ४) अनोळखी गाडीवरील चालक यांनी पिडीत मुलगी हिला दि.०२/०७/२०२५ रोजी सायंकाळी ०६/०० वाचे सुमारास लग्नाचे अमिष दाखवून गाडी क्र. एम एच ४३ सी सी ७८१२ हिच्या मध्ये बळजबरीने बसवुन तु जर आरडा ओरडा केला तर तुझ्या अंगावर अॅसिड टाकु अशी धमकी देवून पिडीत मुलीला वरील आरोपी यांनी आळंदी ता हवेली जिल्हा पुणे येथे नेवून आरोपी नामे सुनिता आंधळे व प्रविण आंधळे रा आळंदी यांनी फिर्यादी व आरोपी याना एका खालीत डांबून ठेवले तेव्हा आरोपी नामे आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे याने फिर्यादी पिडीते सोबत बळजबरीने शरीर संबंध केले वगैरे म // फिर्यादी वरुन शेवगाव पोस्टे गुन्हा रजी नं- ५९७/२०२५ बी.एन.एस ६४,१२७(२) ८७.३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल होताच पोनि संतोष मुटकुळे यांनी फरार आरोपीचया शोध घेणे कामी दोन वेगवेगळी पोलीस पथके नेमुन सदर नमुद गुन्हातील आरोपी हा गेले २० दिवसापासुन त्याचे वेळोवेळी वास्तव्याचे ठिकाण बदलुन पुणे, अहिल्यानगर, जालना, संभाजीनगर येथे राहत होता मा. पोनि संतोष मुटकुळे सो यांना दि. २६/०७/२०२५ रोजी गुप्त् बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नमुद गुन्हयातील फरार आरोपी नामे आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे हा जिल्हा धुळे येथुन ट्रॅक मध्ये बसवून राज्य मध्यप्रदेश कडे पळुन जात असल्याबाबत कळाले तेव्हा शेवगाव पोलीस स्टेशन चे अधिकारी व कर्मचारी यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने यांनी नमुद गुन्हयातील फरार आरोपीला जिल्हा धुळे येथुन दि. २७/०७/२०२५ आज रोजी ताब्यात घेवुन त्यास दाखल गुन्हयात अटक करुन मा// न्यायालया समोर हजर केले असता मा//हु न्यायालयाने आरोपीस दि. ३०/०७/२०२५ रोजी पर्यत पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. वैभव कलुबर्मे अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शना खाली शेवगांवचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक श्री संतोष मुटकुळे पोसई बाजीराव सानप, पोसई रामहरी खेडकर, पोकों भगवान सानप, पोकों शाम गुंजाळ, पोकों संपत खेडकर, पोकों ईश्वर बेरड, पोकॉ राजु बढे, पोकों सचिन पिरगळ व नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुड्डु यांनी केली असुन वरील गुन्ह्यांचा पुढील तपास पोनि संतोष मुटकुळे हे करत आहेत.