
सध्या सोशल मीडियावर एका पोलिस अधिकाऱ्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे सामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यानेच कायद्याचा भंग करत एक दुकानदाराची उघडपणे फसवणूक केल्याचे या व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे.
हा प्रकार एका चष्म्याच्या दुकानात घडला असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे अनेकांनी “हा वर्दीचा माज तरी कधी उतरणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक पोलीस अधिकारी चष्म्याच्या दुकानात जातो, तिथे तो चष्मे पाहतो, एक निवडतो आणि तो घेतो. मात्र दुकानदार त्याच्याकडे पैसे मागतो तेव्हा पोलिस अधिकारी संतापतो, वाद घालतो आणि धमकी देतो.
यूपी के मिर्ज़ापुर में एक इंस्पेक्टर और चश्मे की कीमत को लेकर हुई मोलभाव की बहस गरमागरम हो गई !!
बाद में दरोगा बिना पैसे दिए ही चला गया !!
दुकानदार भी कम नहीं था दुकान में लगे सीसीटीवी कैमरे में कैद हुई पूरी घटना का वीडियो, सोशल मीडिया में कर दिया वायरल!!
#CCTVliveviralVideo…
दुकानदार शांतपणे पैसे मागण्याचा प्रयत्न करत असतो, पण अधिकारी त्याच्यावर दादागिरी करत, पैसे न देता चष्मा घेऊन तसाच निघून जातो. दुकानदारचा आवाज पोलिसाच्या वर्दीसमोर दाबला जातो.
ही घटना नक्की कुठे घडली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु व्हिडीओ @Manoj Sh28986262 या एक्स (पूर्वी ट्विटर) युजरने शेअर केला आहे. लोकांनी या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
काहींनी या प्रकाराला “वर्दीचा सरळ सरळ गैरवापर” म्हटलं आहे, तर काहींनी सांगितलं की “अशा काही अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण पोलिस दलाची बदनामी होते. युजर्सनी विचारलं, “आता सामान्य माणसाला स्वतःच्या वस्तूचे पैसे मागण्याचाही अधिकार नाही का?”




