रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ ! राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट?

    82

    राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा रंगली असताना रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

    नेमका काय आहे दावा ते जाऊन घेऊयात

    ◼️ रोहित पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीसंदर्भात एक मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे 3 गट सक्रिय असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे.

    ◼️ दादांच्या राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले आहेत असं विधान रोहित पवार यांनी केले आहे.अजित पवारांवर आरोप झाल्यास पक्षातील किती प्रमुख नेते दादांची बाजू घेतात? असा सवाल रोहित यांनी उपस्थित केला.

    ◼️ अजित पवारांच्या राष्ट्रावादीतील कोकणातील नेते स्वतःला बॉस समजतात असं म्हणत रोहित पवार यांनी सुनिल तटकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

    ◼️ तर दुसरीकडे तटकरेंवर पत्ते फेकल्यावर काहीजण मारहाण करतात असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादीतील गटबाजीवर भाष्य केले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here