पुणे बंगळुरु मार्गावर खासगी बसमध्ये ३ कोटी ६४ लाखांचे सोनं-चांदीचे दागिने जप्त

पुणे बंगळूर महमार्गावर शनिवारी पहाटे एका खासगी आराम बसवर छापा टाकत बोरगाव पोलिसांनी अवैध रीत्या वाहतूक होणाऱ्या तीन कोटी ६४ लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने जप्त केले.
महामार्गावर मध्यरात्री कराड ते सातारा जाणारे लेनवर नाकाबंदी चालु असताना कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका खासगी आरामबस मधून अवैधरित्या चांदीची वाहतूक होत असल्याची माहिती बोरगाव (ता सातारा) चे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ
यांना मिळाली.त्या माहितीच्या आधारे महामार्गावर नागठाणे चौकात पोलिसांनी सदर खाजगी आरामबस थांबवून झडती घेतली. यावेळी बसमध्ये काही भरलेली पोती असल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी बस पोलीस ठाण्यात आणून ही पोती ताब्यात घेतली.

या बसमध्ये ३ कोटी ५४ लाख ७६ हजार ८०० रुपयांची ५९१ किलो २८० ग्रॅम वजनाचे चांदी सारखे दिसणारे दागिने , ९ लाख ३७ हजार ३०० रुपयांचे एकूण १९ तोळे वजनाचा पिवळ्या धातुचे दागिने त्यामध्ये लाख,गोंडा,दुशीये वेगवेगळे दागिने,एकुण २ किलो १५० ग्रॅम वजनाचा सोन्यासारखा दिसणारा धातू असे मिळून तीन कोटी पेक्षा जास्त रकमेचा सोने चांदीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

बसच्या चालकाकडे अधिक चौकशीत सोनसिंग परमार, अमोल भोसले, मनोजकुमार परमार (सर्वजण रा कोल्हापूर ) यांची नावे सांगितली. त्यांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने याबाबत संशय आल्याने त्यांच्या समक्ष माल जप्त केला आहे.त्यांना या मालाची बिले सादर करता आली नाहीत. या सर्व वस्तू पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये व गाडीच्या डिकी मध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या .

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अपर पोलीस अधीक्षक धिरज पाटील,सहाय्यक पोलीस अधीक्षक आचल दलाल यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ,पोलीस कर्मचारी मनोहर सुर्वे,सुनिल जाधव,किरण निकम, विजय साळुंखे, विशाल जाधव प्रकाश वाघ, राहुल भोये,उत्तम गायकवाड,चालक पवार यांनी केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here