पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ, पुरुषांनी पैसे कसे काढले ? वेगळीच माहिती आली समोर

    153

    राज्यातील महिलांसाठी महत्वाची ठरलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली असून लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांसह आता पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे यामध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये तब्बल 14 हजारहून अधिक पुरुषांना 21.44 कोटी रुपये देण्यात आले.

    या योजनेत अपात्र लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी आता छाननी सुरू आहे. हे सगळं झालं कस असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ऑगस्ट 2024 पासून ही योजना सुरु झाली. योजनेत लाभार्थ्यांची छाननी करताना हा प्रकार उघडकीस आला. सार्वजनिक वितरण प्रणालीतील डेटा तपासल्यावर आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

    यामुळे या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे आता उघड झाले आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. यामध्ये 2 लाख 36 हजार 14 लाभार्थ्यांच्या नावांमध्ये संशय आहे. ते पुरुष असून त्यांनी महिलांच्या नावाने लाभ घेतला असावा, असा संशय आहे. ज्या 14,298 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना दरमहा मिळणारं 1500 रुपये मानधन आता बंद करण्यात आले आहे.

    याबाबत सध्या तपास सुरू आहे. योजनेत झालेल्या घोटाळ्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. महिलांच्या योजनेतून पुरुषांनी अर्ज करुन पैसे कसे मिळवले, हे शोधण्यासाठी आता कागदपत्रांची छाननी सुरू आहे. या प्रकारामुळे मात्र सगळेच हादरले आहेत. यामध्ये पारदर्शकता नसल्याचे दिसून आले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here