मंत्री कदमांच्या मातोश्रींच्या बारवर धाड; 22 बारबाला, 25 ग्राहक ताब्यात; FIRमध्ये काय काय?

    56

    शिवसेना आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावरील बारवर कारवाई झाल्याचा दावा केला. बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी २२ बारबाला आणि २५ ग्राहकांना अटक केली. शिंदेसेनेचे आणखी एक नेते अडचणीत आलेले आहेत.

    गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या बारवर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत दिली. बारमध्ये अश्लील नृत्य सुरु असल्यानं पोलिसांनी कारवाई केली. कदम यांच्या खात्याशी संबंधित असलेला व्यवसाय त्यांच्या मातोश्रीवर करत आहेत. त्यांच्या बारवर कारवाई झालेली आहे, असा सनसनाटी दावा परब यांनी केला.

    आता या प्रकरणातील एफआयआर समोर आलेला आहे.३० मेच्या रात्री मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवलीत असलेल्या सावली बारवर छापा पडला होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास सुरु झालेली कारवाई पहाटे चारपर्यंत कारवाई पहाटे चारपर्यंत चालली.

    पोलिसांनी बारवर छापा टाकून २२ बारबाला, २५ ग्राहक, वेटर, कॅशियर, मॅनेजरला अटक केली. पोलिसांनी मॅनेजरचा जबाब नोंदवला. त्यात त्यानं बारचा परवाना ज्योती रामदास कदम यांच्या नावे असल्याचं सांगितलं. ज्योती कदम या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत. त्या माजी मंत्री रामदास कदम यांच्या पत्नी आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here