बारामतीच्या सत्ताकेंद्रासाठी काका-पुतणा राजकीय रिंगणात; कोण मारणार बाजी?

    75

    बारामतीच्या सत्ताकेंद्रासाठी काका-पुतणा राजकीय रिंगणात; कोण मारणार बाजी?विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः निवडणुकीच्या मैदानात आहेत.

    Malegaon Sahakari Sakhar Karkhana : बारामतीच्या सत्ताकेंद्रासाठी काका-पुतणा राजकीय रिंगणात; कोण मारणार बाजी?

    बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. यंदा पुन्हा एकदा बारामतीच्या सत्ताकेंद्रासाठी काका विरुद्ध पुतणे अशी लढत पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गट रिंगणात उतरला आहे. तर या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

    त्यामुळे बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशा राजकीय सामना रंगला आहे. एकूण चार पॅनल या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून अजित पवारांच्या विरोधात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल मैदानात आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः निवडणुकीच्या मैदानात आहेत. बारामती शहरातील प्रशासकीय भवनातील अभियांत्रिकी कक्षामध्ये अजित पवार थोड्याच वेळात मतदान करणार आहेत. माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 37 गावे येत असून 67 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here