
Pandharpur News : शुभम ज्ञानेश्वर पावले (वय 27 वर्ष) असे चंद्रभागेत बुडून मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. चंद्रभागेत पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे.
Pandharpur News: चंद्रभागेत बुडून भाविकाचा मृत्यू, 3 तासांनंतर सापडला मृतदेह
Pandharpur News : आषाढी वारीच्या तोंडावर चंद्रभागेत बुडून भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
शुभम ज्ञानेश्वर पावले (वय 27 वर्ष) असे चंद्रभागेत बुडून मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. चंद्रभागेत पाण्याचा अंदाज न आल्याने युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. तीन तासाचा शोधकार्यानंतर शुभमचा मृतदेह चंद्रभागेत सापडला. विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या भाविकाचा असा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थानावेळी आळंदी येथे इंद्रायणीला पूर आला. अशीच परिस्थिती आता पंढरपूरच्या आषाढी वारीवर येऊन ठेपली आहे. उजनी धरण हे पुणे जिल्ह्यातील पावसाने झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत पुढील 24 तासात भीमा नदीत धरणातून पाणी सोडले जाऊ शकते. पंढरपुरात 40 हजार क्युसेक्स इतका पाणीसाठा आला तरी चंद्रभागेचे संपूर्ण पात्र पाण्याने व्यापते.
अशा परिस्थीतीत प्रशासनाला आषाढी वारीचे नियोजन करावे लागणार आहे.इंद्रायणी नदीत वारकऱ्याचा NDRF ने वाचवला जीव इंद्रायणी नदीवर स्नान करण्यासाठी गेलेला भाविक गुरुवारी बुडाला होता. अमित तुकाराम राठोड असं या भाविकाचं नाव होतं. स्नान करताना वाहून गेलेल्या या वारकऱ्याला NDRF ने जवळजवळ पाच किलोमीटरवरून या वारकऱ्याला रेस्क्यू केलं आहे. तो वाहून जात असताना NDRF बटालियन क्रमांक ५ च्या टीमने सतर्कता बाळगत त्याला वेळीच नदीतून बाहेर काढले आहे.