
Jalgaon News : स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी अतुल वंजारी हा दुसरा वाल्मीक कराड असल्याचा गंभीर आरोप संजय वराडे यांनी केला आहे.Jalgaon News : ठेकेदाराचा मुख्यमंत्र्याच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोपJalgaon News : ठेकेदाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल आहे. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून ठेकेदाराने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. संजय वराडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराचे नाव आहे.
अचानक घडलेल्या या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. आत्मदहनाचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी ठेकेदाराला ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अतुल वंजारी यांच्याकडून छळ केला जात असल्याचा आरोप वराडे यांनी केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचारी अतुल वंजारी हा दुसरा वाल्मीक कराड असल्याचा गंभीर आरोप संजय वराडे यांनी केला आहे. मात्र संजय वराडे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.




