म्हणून अजित पवारांना चेअरमन व्हायचंय, चंद्रराव तावरेंनी उलगडलं कारखान्याचं राजकारण

    67

    …म्हणून अजित पवारांना चेअरमन व्हायचंय, चंद्रराव तावरेंनी उलगडलं कारखान्याचं राजकारणबारामती: सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे 22 जून ला या कारखान्यासाठी मतदान होणार आहे अजित पवार यांनी या कारखान्यासाठी मी स्वतःच चेअरमन असेल अशी घोषणा केली आहे मात्र दुसरीकडे अजित पवार यांना रोखण्यासाठी सहकार महर्षी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल मैदानात उतरले आहे. अशातच तावरे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांचे जवळपास 12 कारखाने आहेत,ते त्यातून 1 कोटी मेट्रिक टन ऊसाचं गाळप करतात,त्यांना माळेगांव ला दर दिला तर त्यांच्या खाजगी कारखान्यांना देखील द्यावा लागेल हे टाळण्यासाठी अजित पवारांना माळेगांव कारखान्याचा चेअरमन व्हायचं आहे. असा आरोप ही सहकार महर्षी कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी केला आहे.माळेगाव कारखाना सुरुवातीला अडीच हजार टन मॅट्रिक क्षमतेचा होता. त्यामध्ये आम्ही पुढे विस्तार वार कडून 4000 क्षमता केली. त्यानंतर पुढे तो 7500 क्षमतेचा केला. आमच्याच कालावधीत वजन डीस्टलरी यासारखे प्रकल्प काढले याशिवाय सभासदांच्या मालकीचा हक्काचं असं एक शैक्षणिक संकुल काढले. यामध्ये जवळपास सात हजारहुन अधिक विद्यार्थी शकतात. डिग्री व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केला. आज प्रत्येक घरात एक दोन इंजिनिअर आहेत.

    सभासदांच्या मुलांना आमच्या कॉलेजात 1000 हजार रुपयात ऍडमिशन घेता येत, उर्वरित पैसे ऊस बिलातून कपात केले जातात, असंही चंद्रराव तावरे म्हणाले.आम्ही मंगल कार्यालय काढले यातून 19 हजार रुपयात सर्व सुविधा आम्ही देतो हे राज्यात कोणी केलं नाही. कारखान्यात 60 हजार प्रति दीन क्षमतेने इथेनॉल निमिती केली जाते.आम्ही आजपर्यंत निस्वार्थी सेवा केली आहे असं ही तावरे म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे तावरेंच्या कार्यकाळात पाच वर्षाच्या सरसरीत माळेगांव कारखान्याचा ऊस दराचा आलेख उच्चांकी राहिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

    माळेगांव 12200.00सोमेश्वर 11427.00छत्रपती 9726.71भीमाशंकर 10665.00घोडगंगा 9744.30संत तुकाराम 9637.17

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here