देहूनगरीत पार पडला संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा

    71

    जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला आहे. ह्या पालखी प्रस्थान सोहळ्याला वरूण राजाने देखील हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळाले आहे. दुपारी 3.58 च्या सुमारास पालखीने मंदिराबाहेर प्रस्थान ठेवले आहे. पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे. पालखीचे उद्या पिंपरी चिंचवड शहरात आगमन होणार आहे.

    उद्या पिंपरीतील आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखी मुक्कामी असणार आहे.टाळ- मृदुंगाच्या गजरात रामकृष्ण हरीच्या जयघोषात हजारो भाविक देहूत दाखल झाले आहे. मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. सोमवारपासूनच देहूनगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते. आज सकाळी देखील इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचे दर्शन घेतलं. पहाटेपासून विधिवत पूजा, आरती नंतर या सोहळ्याची सुरुवात झाली.

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी उपस्थितीत होते. पालकमंत्री अजित पवार यांनी आधीच देहू मंदिरात भेट देऊन तुकोबांचं दर्शन घेतलं. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके यांची देखील उपस्थिती होती. वर्षातून एकदा येणाऱ्या या आषाढी वारीसाठी देहू, आळंदीमध्ये हजारो वारकरी दाखल होतात. ज्ञानोबा- तुकोबाच्या गजरामध्ये देहभान हरपून टाळ- मृदंगाच्या तालावर स्वतःला झोकून देतात. फुगडी, भगवी पताका घेऊन एक- एक दिंडी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे.संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा हा अतिशय मनमोहक असतो. हा पाहण्यासाठी लाबून लांबून भाविक येत असता. तुकोबांच्या जयघोषाने संपूर्ण देहू नगरी यावेळी दणाणून जाते. या सोहळ्याचे विलोभनीय दृष्य भाविक आपल्या डोळ्यात साठवून ठेवत असतात. यावेळी या पालखीचे दर्शन घेण्यासाठी ही भाविक गर्दी करत असतात. आता ही पालखी पंढपूरच्या दिशेने निघाली आहे. आषाढी एकादशी पर्यंत ती पंढरपूरला पोहोचेल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here